नवी मुंबई: तीन दिवसांत सव्वादोन लाख श्रोते

नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स स्टेडियम ‘कोल्डप्ले’ या जागतिक दर्जाच्या संगीत कार्यक्रमाचे १८, १९ आणि २१ जानेवारीला करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी दिवसाला सुमारे ७५ हजार म्हणजेच तीन दिवसांत सव्वादोन लाख श्रोते उपस्थित राहतील. त्यामुळे नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवरील ताण लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी चोख नियोजन केल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, जड-अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी असली तरी शहरांतर्गत तसेच शीव-पनवेल मार्गावरील नियमित वाहतुकीला कुठेही अडथळा होऊ नये, याची दक्षता घेण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे आणि वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी ‘कोल्डप्ले’निमित्त पोलीस आणि वाहतूक नियोजनाबाबतची माहिती दिली. कार्यक्रमाच्या तीनही दिवस एक पोलीस उपायुक्त, ७० पोलीस अधिकारी, ४३४ पोलीस कर्मचारी तैनात असतील. वाहतूक पोलीस उपायुक्त, २१ पोलीस अधिकारी, ४४० पोलीस कर्मचारी याशिवाय आयोजकांचे ४०० वार्ड असा बंदोबस्त असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *