कर्जतमध्ये बॉडी स्प्रे च्या डब्याचा स्फोट झाला . स्फोटाच्या वेळी मोठा आवाज झाला यात घराच्या भिंतींना तडे गेले. खिडक्यांची तावदाने फुटली. राहुल डाळींब कर यांच्या घरात हा प्रकार घडला. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कुणी जखमी झालं नाही. घरातील लहान मुलाने बॉडी स्प्रेचा डबा गॅस शेगडी जवळ ठेवला आणि उष्णतेने त्याचा स्फोट झाल्याचं सांगितलं जात आहे.
