यंदा गहू मुबलक; देशात उच्चांकी लागवड; रब्बी पेरण्या ६३२ लाख हेक्टरवर; पोषक वातावरणाचा परिणाम

देशातील रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. मंगळवारअखेर (१४ जानेवारी) देशभरात ६३२.२७ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. गव्हाची पेरणी उच्चांकी क्षेत्रावर झाली आहे. पाण्याची चांगली उपलब्धता आणि चांगली थंडी पडल्यामुळे गव्हाला पोषक वातावरण आहे. त्यामुळे यंदा देशात गव्हाचे उच्चांकी उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवारअखेर ( १४ जानेवारी) देशभरात एकूण ६३२.२७ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. एकूण पेरण्यांमध्ये गहू, मका, बार्ली आणि मोहरीच्या पेरण्यांनी आघाडी घेतली आहे. देशभरात रब्बी हंगामात सरासरी ३१२.३५ लाख हेक्टरवर गव्हाची पेरणी होते, यंदा ३२० लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरीपेक्षा साडेसात लाख हेक्टरने गव्हाच्या पेरणीत वाढ झाली आहे. चांगल्या पावसाळ्यामुळे गहू उत्पादक पट्ट्यात सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता चांगली आहे. अपेक्षित थंडीही पडत आहे. त्यामुळे यंदा उच्चांकी गहू उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *