वाल्मिक कराडवर मकोका; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

बीड जिल्ह्यातील केज न्यायालयाने खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत मोठा निर्णय दिला आहे. वाल्मिक कराडवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर कराडची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. खंडणी प्रकरणाबाबत वाल्मिक कराड याला आज (१४ जानेवारी) बीडच्या केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयात सरकारी वकिलांनी वाल्मिकची सीआयडी कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातही वाल्मिक कराड प्रमुख आरोपी आहे. या हत्या प्रकरणाचे पुरावे गोळा करण्याचं काम देखील दुसऱ्या बाजूला चालू आहे.

सीआयडीने खंडणी प्रकरण व संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिकची चौकशी करण्यासाठी त्याची सीआयडी कोठडी मागितली होती. मात्र, न्यायमूर्तींनी न्यायालयीन कोठडी दिली आहे. खंडणी प्रकरणात त्याची अजून १४ दिवस चौकशी केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *