आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विद्यार्थ्याच्या एक्स-गर्लफ्रेंडला अटक; जुळवून घेण्यास दिलेला नकार

उत्तर प्रदेश पोलिसांनी एका तरुणीला अटक केली आहे. या तरुणीवर एका युवकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा आरोप आहे. दोन दिवसांपूर्वी नोएडा येथील एका इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत एका तरुणाने आत्महत्या केली होती. मृत तरुण हा नोएडातील एका खासगी विद्यापीठात कायद्याचा अभ्यास करत होता. या तरुणाच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीला (एक्स-गर्लफ्रेंड) अटक करण्यात आली आहे. ही घटना नोएडा शहरातील सेक्टर ९९ मधील सुप्रीम टॉवरमध्ये घडली आहे. मृत तरुणाचं नाव तपस असं असून तो मूळचा उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबादचा रहिवासी होता. सुप्रीम टॉवरमधील एका फ्लॅटमध्ये तो दोन मित्रांबरोबर राहत होता.

मृत तपसच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपसच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणीला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *