जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमधील गोळीबार प्रकरण : आरोपी चेतन सिंह मानसिक आजाराने ग्रस्त, अकोला कारागृह प्रशासनाची सत्र न्यायालयात माहिती

 जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये बेछूट गोळीबार करून आपल्या वरिष्ठांसह तीन प्रवाशांची हत्या केल्याच्या आरोपांतर्गत अटकेत असलेला रेल्वे पोलीस दलाचा (आरपीएफ) हवालदार चेतन सिंह चौधरी हा मानसिक आजाराने ग्रस्त आहे. तसेच, त्याला उपचारांची आणि त्यासाठी नागपूर मानसिक रुग्णालयात हलवण्याची आवश्यकता असल्याचे अकोला येथील कारागृह प्रशासनाने गुरुवारी मुंबईतील सत्र न्यायालयाला सांगितले.

चेतन याच्यावर सध्या दिंडोशी सत्र न्यायालयात खटला चालवण्यात येत आहे. चेतन याची प्रकृती १९ डिसेंबर रोजी बिघडली होती, असे पत्र अकोला कारागृह अधीक्षकांनी सत्र न्यायालयाला पत्र पाठवले होते. त्यामुळे, त्याला वैद्यकीय उपचारांसाठी अकोला येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याची तपासणी केल्यानंतर, त्याच्यात मानसिक आजाराची लक्षणे आढळून आल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. तसेच, चेतन याला पुढील उपचारांसाठी नागपूर येथील प्रादेशिक मानसिक रुग्णालयात दाखल करण्याची शिफारस केल्याचे कारागृह अधीक्षकांनी पत्राद्वारे न्यायालयाला कळवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *