मालेगाव बँक खात्यांद्वारे कोट्यावधींचे गैरव्यवहार प्रकरण : दुबईला पळण्याच्या तयारीत दोघांना गुजरात विमानतळावरून अटक

मालेगाव येथील व्यापाऱ्याने दोन बँकांमध्ये १४ खाती उघडून १२०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी दोन आरोपींना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अहमदाबाद विमानतळावरून अटक केली. मुख्य आरोपी हे मोहम्मद भागड ऊर्फ चॅलेंजर किंग ऊर्फ एमडी याचे साथीदार असून ते दुबईला पळण्याचा प्रयत्न करत होते.

हा गैरव्यवहार १२०० कोटी रुपयांचा असल्याचा संशय आहे. बनावट कंपनीद्वारे २१ बँक खात्यांतून करण्यात आलेल्या ८०० कोटी रुपयांच्या व्यवहारांची माहिती ईडीला मिळाली आहे. त्यातील बहुसंख्य कंपन्या एकाच्या मालकीच्या असून त्या नवी मुंबई, सूरत, अहमदाबाद, उत्तर प्रदेश व दिल्ली येथील असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *