लाच मागितल्याप्रकरणी मुकादमाला अटक

सफाई कामगार म्हणून नोकरी देतो सांगून पालिकेच्या अंधेरीतील के/वेस्ट वार्डमधील मुकादम सतीश पिटया जाधव (५५) यांनी ३ लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी लाचेचा २० हजाराचा हफ्ता स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्यांना बुधवारी अटक केली .

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असून त्यांना कायमस्वरुपी नोकरीची आवश्यकता होती. त्यावेळी त्यांची ओळख जाधव यांच्याशी झाली. जाधवने १२ डिसेंबरला तक्रारदाराला पालिकेत कचरा उचलण्याच्या गाडीवर सफाई कामगार म्हणून नोकरी देतो असे सांगितले. तसेच सहा महिन्यात नोकरी कायमस्वरूपी होईल असे आमिष दाखवले. त्यासाठी कागदपत्रे तयार करण्यासाठी ५० हजार, नंतर अडीच लाख अशी एकूण ३ लाखांची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *