कुर्ला बस दुर्घटना चालकामुळेच, संजय मोरेच्या जामिनाला विरोध करताना पोलिसांचा न्यायालयात दावा

दोन आठवड्यांपूर्वी कुर्ला पश्चिम येथे झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी आणि बस चालक संजय मोरे हा घटनेच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत नव्हता. तसेच, बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नव्हता. त्यामुळे, मोरे याच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचा दावा करून पोलिसांनी त्याच्या जामीन अर्जाला गुरुवारी विरोध केला.

आपण निर्दोष असून बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा करून मोरे याने गेल्या आठवड्यात जामिनाच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश सचिन पवार यांच्यासमोर मोरे याच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी, पोलिसांच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील प्रभाकर तरंगे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून मोरे याला जामीन देण्यास विरोध केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *