विनाअनुदानित सिलिंडर ४२ रुपयांनी स्वस्त

विनाअनुदानित सिलिंडर ४२ रुपयांनी स्वस्त

देशातील विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमती ४२ रुपयांनी स्वस्त झाल्या असून हवाई इंधन ५.५ टक्क्याने महागले आहे. तर केरोसिनच्या किंमती ५४ पैशांनी वाढल्या असून त्या ४३.१८ रुपये झाल्या आहेत.

तेल कंपन्यांनी १४.२ किलोच्या विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात ४२ रुपयांनी कपात केली. दिल्लीतील विनाअनुदानित सिलिंडरचा नवीन दर ५१७.५० रुपये असेल.

गेल्या चार महिन्यात सलग चौथ्यांदा विनाअनुदानित सिलिंडरचे दर कमी झाले आहेत. तर विनाअनुदानित केरोसिनच्या दरात ४३ पैशांनी वाढ झाली.

दिल्लीत हवाई इंधनाचे दर किलोलिटरमागे २२४५.९२ रुपयांनी वाढले असून ते ४३१८४.१६ रुपये झाले आहे. प्रत्येक विमानतळावर हे दर वेगळे असणार आहेत.

मुंबईत सीएनजी, पीएनजी स्वस्त

मुंबईत महानगर गॅस कंपनीने सीएनजी व पीएनजीच्या दरात कपात केली आहे. ही कपात २ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. सीएनजीची किंमत किलोमागे १.०५ रुपये तर पीएनजी ०.५४ पैशांनी कमी होणार आहे.

दर कपातीनंतर सीएनजी ४१.९० रुपये तर पीएनजी ४२.८५ रुपयांना मिळेल. पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत सीएनजी व पीएनजी अनुक्रमे ५८ ते २० टक्के स्वस्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *