आम्ही मर्जीनुसार सनातनमध्ये, यूपीच्या बहिणींचं स्पष्टीकरण

आम्ही मर्जीनुसार सनातनमध्ये, यूपीच्या बहिणींचं स्पष्टीकरण

“आम्ही आमच्या मर्जीनुसार सनातनच्या आश्रमात आलो आहोत. आमच्यावर कोणीही दबाव, जोरजबरदस्ती केली नाही”, असं स्पष्टीकरण सनातनच्या साधक प्रीती आणि प्रिया या बहिणींनी दिलं आहे.

 

उत्तर प्रदेशातल्या भदोईच्या चौरसिया परिवारातील प्रीती आणि प्रिया यांना संमोहित करून, सनातनच्या आश्रमात डांबल्याचा आरोप, चौरसिया कुटुंबियांनी केला आहे. मात्र त्याला आज प्रीती आणि प्रिया यांनी उत्तर दिलं.

सनातनने आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव, चौरसिया कुटुंब आणि माध्यमांवर हल्लोबोल केला. यावेळी सनातनच्या साधक स्वाती, प्रीती आणि प्रिया उपस्थित होत्या.

मर्जीने आश्रमात

 

आम्ही स्वत:च्या मर्जीने सनातन आश्रमात आलो, आम्हाला कोणीही जबरदस्तीने आणलं नाही, असं प्रीती आणि प्रिया म्हणाल्या. तसंच आमचे कुटुंबीय आमच्यावर नको ते आरोप करत असल्याचा दावाही त्यांनी केला. आमचा भाऊ खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहे, मात्र तो ज्या पैशावर उड्या मारतो, तो आम्हीच त्याला पुरवला आहे. आमच्या पैशावरच तो ‘अय्याशी’ करत आहे, असा आरोपही दोन्ही बहिणींनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *