खोपोली शिळफाटा येथे टँकरला अपघात, रसायन गळतीने आसपासच्या परिसरात आग पसरली

खोपोली शिळफाटा येथे टँकर उलटून अपघात झाला. अपघातानंतर टँकरला अचानक आग लागली. टँकरला लागलेल्या आगीमुळे रस्त्यालगत असलेल्या गवताने पेट घेतला आणि आग पसरायला सुरुवात झाली. यामुळे रस्त्यालगत डोंगरावर असलेल्या वस्तीला धोका निर्माण झाला.

टँकर मधील रसायनाने पेट घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहेत. खबरदारी म्हणून या परिसरातील वाहतूक थांबवण्यात आली असून वीज पुरवठा ही खंडित करण्यात आला आहे.

खोपोली नगर पालिका, जे एस डब्लू , टाटा कंपनी व इतर फायर ब्रिगेडने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *