मागील काही वर्षांमध्ये सायबर गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असून, सामान्यच नव्हे, तर अगदी सरकारी कामजही याच्या विळख्यात येताना दिसत आहे. नुकत्याच घडलेल्या एका अनपेक्षित घटनेमुळं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. नुकतंच National Company Law Tribunal अर्थात राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाच्या सुनावणीदरम्यान अचानकच स्क्रीनवर अश्लील व्हिडीओ सुरू झाला आणि एकच खळबळ माजली.
प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार 12 आणि 17 डिसेंबर या दोन दिवशी हॅकरकडून या प्राधिकरणाचं संकेतस्थळ आणि संपूर्ण वेब प्रणाली हॅक करत व्हिडीओ चालवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. सदर प्रकरणावरील तक्रारीनंतर शुक्रवारी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एनसीएलटीचे डेप्युटी रजिस्ट्रार चरण प्रताप सिंह यांनी ही तक्रार केली होती.
