महाबळेश्वरमध्ये दरीत उडी मारून आत्महत्या

 महाबळेश्वर येथील लॉडविक पॉईंट परिसरात गुरुवारी सायंकाळी एकाने चारशे फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केली. संजय वेलजी रुघानी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

गुरुवारी सायंकाळी लॉडविक पॉईंट येथे पर्यटकांची मोठी गर्दी होती. नवदाम्पत्य व परदेशी पर्यटक या पॉइंटवर पर्यटनाचा आनंद घेत होते. याच वेळी रुघानी यांनी आपल्या जवळपास कुणीही नसल्याचा अंदाज घेत त्यांनी थेट स्वतःला दरीमध्ये झोकून देऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती स्थानिक व्यवसायिकांनी पोलिसांना दिली. यानंतर घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह काही गिर्यारोहकही लगोलग हजर झाले. यानंतर गिर्यारोहकांच्या मदतीने तब्बल सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर रुघानी यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *