‘मला माफ कर, मी चुकीचं पाऊल उचलतेय’, प्रियकराला व्हिडीओ संदेश पाठवत तरुणीची आत्महत्या

गुजरातच्या पालनपूर येथील एका तरुणीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्यापूर्वी तिने दोन व्हिडीओ रेकॉर्ड करून आपल्या प्रियकराची माफी मागितली आहे. घरातील भांडणाला कंटाळून मी या जगाचा निरोप घेत आहे, मला माफ कर, असे या तरुणीने व्हिडीओत म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर तरुणीचे नाव राधा ठाकोर असे आहे. पालनपूर येथील ताजपुरा परिसरात ती आपल्या बहिणीच्या घरी राहत होती. येथेच त्यांचे ब्युटी सलोनही होते.

सोमवारी, १६ डिसेंबर रोजी राधा राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्यानंतर तिच्या बहिणीने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *