ठाण्यात टिएमटीचे कंत्राटी चालक अघोषित संपावर, नागरिकांचे हाल

 ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेतील सुमारे ५५० कंत्राटी चालक मंगळवारी सकाळी अघोषित संपावर गेले आहेत. ठेकेदारामार्फत वाढीव वेतन मिळालेले नाही. त्यामुळे हा संप पुकारल्याचे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या संपामुळे बस थांब्यावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. वाहतूक कोंडी त्यातच, टिएमटी चालकांचा संप या दोन्ही प्रकारामुळे नागरिकांचे हाल झाले.

ठाणे महापालिका क्षेत्रात टिएमटीच्या माध्यमातून महापालिका सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देते. टिएमटीच्या ताफ्यात ४७४ बसगाड्या असल्या तरी यातील सुमारे ५० बसगाड्या विविध कारणांमुळे प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध होत नाही. यातील २२५ बसगाड्या खासगी ठेकेदारामार्फत चालविल्या जातात. या बसगाड्या घोडबंदर येथील आनंद नगर आगारातून सुटतात. ठाण्यातील लोकसंख्येच्या तुलनेत टिएमटी बसगाड्यांची सुविधा पुरेशी नाही. त्यामुळे दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळेत या बसगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *