मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाचा दर्शनाला दरवर्षी लाखो भाविक येतात. अनेक जण आपला नवस पूर्ण झाला म्हणून बाप्पाच्या चरणी सोनं, चांदी, पैसा दान करतात.
आतापर्यंत आलेल्या दानामध्ये सात किलो सोनं, 101 किलो चांदी आणि सहा कोटी रुपयांचा समावेश आहे. ही मोजणी अजूनही सुरू आहे. त्यामुळं ही आकडेवारी आणखी वाढेल.
गेल्यावर्षी लालबागच्या राजाच्या चरणी 5.3 किलो सोनं, 110 किलो चांदी आणि सात कोटी रुपये अर्पण करण्यात आले होते.
‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे कर्मचारी आणि महानगर को ऑपरेटिव्ह बँकेचे कर्मचारी या रकमेची मोजणी करत आहेत.

