मित्रांबरोबर गेला, दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत

‘क्राईम पेट्रोल’ फेम अभिनेत्री सपना सिंहच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (१० डिसेंबर रोजी) तिच्या १४ वर्षांचा मुलगा संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळला. याप्रकरणी पोलिसांनी मृत मुलाच्या दोन मित्रांना अटक केली आहे. सपनाने उत्तर प्रदेशमधील बरेली येथे आंदोलन केलं आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायाची मागणी केली. आरोपींवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर तिने आंदोलन संपवलं.

सपना सिंहचा मुलगा सागर गंगवार सोमवारी (९ डिसेंबर) रात्री मित्रांबरोबर बाहेर गेला होता, त्यानंतर तो बेपत्ता झाला. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह एका शेतात सापडला. त्याच्या डोक्याला बंदुकीच्या गोळीच्या जखमा होत्या. त्याचे हात तुटले होते आणि पोटावरही जखमा होत्या. सपनाच्या म्हणण्यानुसार. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सागर मित्रांबरोबर जाताना दिसला, मात्र तो परत आला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *