खेळायला गेला तो परत आलाच नाही… इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयात पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू

निर्माणाधीन इमारतींच्या परिसरांमध्ये घडणाऱ्या दुर्घटना आजवर अनेकदा समोर आल्या आहेत. त्यातच आणखी एका काळीज पिळवटणाऱ्या घटनेची भर पडली असून, नवी मुंबईमध्ये घडलेल्या या घटनेनं सारेच हादरले आहेत.

नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर-5 मध्ये इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयात पडून एका 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. अंकित पानसिंग ठनगुगा असं या दुर्घटनेतील मृत मुलाचं नाव सांगितलं जात आहे. घटनास्थळी ज्या बांधकाम साईडवरील खड्डयात पडुन लहानग्या अंकितचा मृत्यू झाला, त्या खड्डयाच्या आजुबाजुला सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली नसल्यामुळे अंकित मित्रासोबत खेळता खेळता त्यात पडल्याचं आढळून आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *