वर्सोव्यात मनसे उमेदवाराला दोन्ही वेळेस सारखीच मते

वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील मनसेच्या उमेदवाराला गेल्या विधानसभा निवडणूकीत जेवढी मते मिळाली अगदी तेवढीच मते त्यांना २०२४च्या विधानसभा निवडणुकीत मिळाली आहेत. या योगायोगाबद्दल मनसेच्या उमेदवाराने आश्चर्य व्यक्त केले आहे. दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांना ५,०३७ मते मिळाली आहेत. त्यामुळे वर्सोवात ‘ईव्हीएम बेवफा है’ असे फलक लावण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *