कुलाब्यातील प्रकल्पाला पालिकेची स्थगिती?

दक्षिण मुंबईतील कुपरेज मैदानात लहान मुलांसाठी हॉर्स कॅरोसेल अर्थात फिरते चक्र (मेरी गो राऊंड) तयार करण्याच्या प्रकल्पाला पालिका प्रशासनाने स्थगिती दिल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केला आहे. माजी विधानसभा अध्यक्ष व भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांच्या संकल्पनेतून आलेल्या चार प्रकल्पांना आतापर्यंत पालिका प्रशासनाने स्थगिती दिल्याचा आरोपही त्यांनी केला असून पालिका प्रशासन हे कुलाबा विरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *