यगड जिल्ह्यातील सात विधानसभा ५४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यात मनसे, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, महाड आणि श्रीवर्धन मतदारसंघासाठी निवडणूक पार पडली. या निवडणूकीसाठी सात मतदारसंघातून एकूण ७३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ज्यात पनवेल मधील १३, कर्जत मधील ९, उरण मधील १४, पेण मधील ७, अलिबाग मधील १४, श्रीवर्धन मधील ११ तर महाड मधील ५ उमेदवारांचा समावेश होता. अपेक्षित मते न मिळाल्याने यातील ५४ उमेदवारांनी भरलेली अनामत रक्कम जप्त झाली आहे. महाडमध्ये ३ ,पनवेल १०, श्रीवर्धन ९, उरण ११, कर्जत ६, पेण ४, अलिबाग ११ अशी अनामत रक्कम जप्त झाली आहे. यात मनसे, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी यांच्यासह इतर नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
कोणाची अनामत रक्कम वाचली…. विजयी झालेल्या आ.प्रशांत ठाकूर( पनवेल),महेंद्र थोरवे (कर्जत),रविंद्र पाटील( पेण),महेश बालदी (उरण),अलिबाग (महेंद्र दळवी),आदिती तटकरे( श्रीवर्धन),भरत गोगावले ( महाड ) यांची अनामत रक्कम वाचली आहे. त्याच बरोबर पक्षांचे प्रमुख पराभूत उमेदवार बाळाराम पाटील,लीना गरड ( पनवेल),सुधाकर घारे,नितीन सावंत (कर्जत),प्रीतम म्हात्रे,मनोहर भोईर ( उरण),प्रसाद भोईर,अतुल म्हात्रे (पेण),चित्रलेखा पाटील,दिलीप भोईर( अलिबाग),अनिल नवगणे( श्रीवर्धन),स्नेहल जगताप( महाड) याची अनामत रक्कम वाचली आहे. उर्वरीत सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.
