वृद्ध महिलेची ७८ लाखांची सायबर फसवणूक

आर्थिक गैरव्यवहारात अडकल्याची भीती दाखवून बोरिवलीमधील वृद्ध महिलेची ७८ लाख ७० हजार रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरोधात उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

६७ वर्षांची तक्रारदार महिला बोरिवलीतील गोराई परिसरात राहते. त्या एचपीसीएल या शासकीय तेल कंपनीतून २०१८ साली निवृत्त झाल्या. त्यांना ९ ऑक्टोंबरला अजयकुमार नावाच्या एका व्यक्तीने दूरध्वनी करुन मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना विभागातून बोलत असल्याचे सांगितले. तक्रारदार महिलेविरोधात न्यायालयाचे अटक वॉरंट जारी केला असून कुठल्याही क्षणी अटकेची कारवाई होईल, असे त्याने सांगितले. यावेळी त्यांनी आपल्याविरोधातील खटल्याची विचारणा केली. बंगळुरू पोलिसांनी त्यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला असून त्याबाबत हा वॉरंट जारी करण्यात आल्याचे त्याने सांगितले. त्यांच्या आधारकार्डसह इतर दस्तावेजाच्या आधारे बँकेत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला आहे. ही रक्कम आर्थिक गैरव्यवहारातील असून त्यांच्यासह इतराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, असे सांगून त्याने दूरध्वनी संबंधित पोलीस अधिकार्‍याला दिला. त्यानंतर विनयकुमार चौबे असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने नंतर तिच्याशी संभाषण सुरू केले. आपण बंगळुरू पोलीस दलात कामाला असल्याचे त्याने सांगितले. यावेळी तक्रारदार महिलेने या संपूर्ण प्रकरणाशी तिचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. त्याने त्यांना स्काईप अप्स डाऊनलोड करण्यास सांगून चौकशी सुरू केली होती. एका व्यक्तीचे छायाचित्र पाठवून त्याला आर्थिक गैरव्यवहारात अटक झाली आहे. त्याच्याकडे काही क्रेडिट कार्ड सापडली होती. त्यात एक कार्ड तक्रारदार महिलेच्या नावावर असल्याचे त्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *