चोरीचे दागिने विक्रीसाठी आला आणि जाळ्यात अडकला; नेपाळी चोरटा गजाआड; १२ लाखांचा ऐवज जप्त

रफोडी केल्यानंतर दागिने विक्रीसाठी आलेल्या नेपाळमधील चोरट्याला गुन्हे शाखेने अटक केली. नेपाळी चोरट्याकडून ११ लाख ५९ रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले. चोरट्याने शहरातील उच्चभ्रु सोसायटीत घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

अनिल मीनसिंग खडका (वय २५, सध्या रा. वारजे मा‌ळवाडी, मूळ रा. नेपाळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. खडकाने २२ नोव्हेंबर रोजी हडपसर भागातील एका उच्चभ्रु सोसायटीत घरफोडी केली होती. तो ज्येष्ठ नागरिकांची शुश्रुषा करायचा. उच्चभ्रु सोसायटीतील बंद सदनिकांची पाहणी तो करायचा. हडपसर भागातील एका सदनिकेत तो गॅलरीतून शिरला. त्यानंतर त्याने शयनगृहातील कपाट उचकटून दागिने, रोकड चोरी केली होती. ऐवज चोरून तो पसार झाला होता. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *