मुंबई : १२५ कोटीच्या संशयित व्यवहारांप्रकरणी एकाला अटक

मालेगाव बँकेतील १२५ कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने अहमदाबाद विमानतळावरून अक्रम मोहम्मद शफीला अटक केली. त्याच्याविरोधात लुक आऊट सर्कुलर जारी करण्यात आले होते. तो दुबईला जाण्याचा प्रयत्न करत असताना इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले.

मालेगाव येथील सिराज अहमदने दोन बँकांमध्ये १४ खाती उघडून त्यातील रकमेचा निवडणुकीसाठी कथित गैरवापर केल्याच्या आरोप आहे. याप्रकरणी ईडीने गेल्या आठवड्या ठाणे, वाशी, मालेगाव, नाशिक, सूरत आणि अहमदाबादमध्ये व्यापारी आणि बनावट कंपन्यांशी संबंधित २४ ठिकाणी छापे टाकले होते. गेल्या सहा महिन्यांपासून मालेगावमधील १४ बँक खात्यांमध्ये सुमारे १२५ कोटी रुपये जमा झाले असून त्यातील रक्कम अहमदाबाद येथील १० बँक खात्यांवर हस्तांतरित झाली आहे. अहमदाबाद येथील १० बँक खात्यांमध्ये २०० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. बँक खात्यातून ही रक्कम काढण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *