नाशिक: येवल्याजवळील अपघातात दोन जणांचा मृत्यू, १८ प्रवासी जखमी

येवला ते मनमाड महामार्गावर अनकाई पाटी येथे मालवाहतूक वाहन आणि राज्य परिवहन महामंडळाच्या मनमाड आगाराची बस यांची धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनचालकांचा मृत्यू झाला. तर १८ प्रवासी जखमी झाले.

बुधवारी मनमाडहून शिर्डीकडे जाणारी बस चालक मोठा भाऊ गांगुर्डे घेऊन निघाले होते. येवल्याजवळील अनकाई पाटी येथे आली असता अवजड मालवाहतूक वाहनाला धडक बसली. या अपघातात बस चालक मोठाभाऊ गांगुर्डे यांच्यासह मालवाहतूक वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्यास सुरूवात केली. अपघातात बसमधील १८ प्रवासी जखमी असून इंदूबाई मोरे (रा. नाटेगाव) आणि शोभा कुमावत (रा. ब्राह्मणगाव) या गंभीर जखमी आहेत. त्यांना कोपरगाव तसेच नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *