राज्याचं किमान तापमान 11 अंशांवर; कुठे पडलीये कडाक्याची थंडी? मुंबईत मात्र उकाडा कायम

उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत असताना आणि हिमाचल, काश्मीरवरून शीतलहरी देशाचा मध्य भाग व्यापत असतानाच महाराष्ट्रावरही याचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. राज्यातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये तापमानात लक्षणीय घट झाल्याची बाब निदर्शनास आली असून, कोकण क्षेत्रही यास अपवाद नाही. उत्तरेकडील वाऱ्यांमुळं महाराष्ट्रात गारठा वाढत असतानाच मुंबईत मात्र एकाएकी उकाडा वाढण्यास सुरुवात झाली आहे. हवामानातील हा अनपेक्षित बदल नागरिकांच्या जीवाची काहिली करताना दिसत आहे.

निफाड, नाशिक, नागपूर, गडचिरोली इथं किमान तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. राज्यातील परभणी इथं नीच्चांकी तापमान धुळे 11 अंश, 11.3 अंश असून किमान तापमानाचा हा आकडा निफाडमध्ये 13 अंशांदरम्यान असल्याचं पाहायला मिळत आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 15 अंशांहून कमी झाल्याचं लक्षात येत आहे. पुढील 24 तास आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये राज्यातील तापमानाचा आकडा 2 ते 4 अंशांनी आणखी घटण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

राज्यातील दक्षिणेकडील भाग आणि कोकण किनारपट्टी क्षेत्र मात्र या हिवाळ्याच्या स्थितीला अपवाद ठरत आहे. देशातील कोमोरिन क्षेत्रामध्ये चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होत असल्यामुळं दक्षिण भारतामध्ये पावसानं हजेरी लावली आहे. हवामानात मोठ्या प्रमाणात सातत्यानं हे बदल होत असतानाच राज्यात सोमवारी सर्वाधिक किमान तापमान सोमवारी कुलाबा येथे नोंदवण्यात आलं. मुंबईत पहाटे काहीसा गारवा जाणवण्यास सुरूवात झाली असली तरीही सूर्य डोक्यावर येताना मात्र प्रचंड उकाडा जाणवू लागला आहे.

मुंबईत किमान तापमानासह कमाल तापमानाचा पारा अद्यापही चढा असल्या कारणानं उष्मा कायम आहे. मुळात थंडी पडण्यासाठी किमान तापमानासोबतच कमाल तापमानातही घट अपेक्षित आहे. त्यामुळं मुंबईकरांना पुढील 48 तास तरी थंडीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या दरम्यान शहरातील किमान तापमान साधारण 18 ते 22 अंशांदरम्यान राहणार असून, उकाडा आणि गारठ्याची ही जुगलबंदी इतक्यात संपणार नाही हेच स्पष्ट होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *