नवी मुंबईत विमानाचं लवकरच टेक ऑफ होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीवर यशस्वी चाचणी घेण्यात आली. हवाई दलाचं सुखोई 30 विमान धावपट्टीवरून उडान केले. लवकरचं हे विमानतळ प्रत्यक्षात कार्यन्वित होणार आहे. मात्र, या विमानतळावर पोहचण्याआधी प्रवाशांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे ते म्हणजे वाहतूक कोंडी. मात्र, यावर मोठा पर्याय शोधण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यातून फक्त 17 मिनीटांत नवी मुंबई एअरपोर्ट गाठता येणार आहे. हायस्पीड वॉटर टॅक्सीतून प्रवाशांचा हा सुसाट प्रवास होणार आहे.
नुकतीच हायस्पीड वॉटर टॅक्सीची घोषणा करण्यात आली आहे. या हायस्पीड वॉटर टॅक्सीच्या माध्यपातून मुंबईहून आता नवी मुंबई विमानतळ फक्त 20 मिनिटांत गाठता येणार आहे. तर, ठाणे ते नवी मुंबई विमानतळ हा प्रवास फक्त 17 मिनीटांत पूर्ण होणार आहे. नवी मुंबई विमानतळाजवळ जेट्टी उभारली जाणार आहे. जेट्टीसाठी लवकरच जागा निश्चित करण्यात येणारंय. या जेट्टीच्या माध्यमातून हायस्पीड वॉटर टॅक्सीचा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. यामुळे तासा दीड तासाचा प्रवास करावा लागणार नाही. अवघ्या काही मिनीटांत नवी मुंबई विमानतळ गाठता येणार आहे.
मुंबईमध्ये लवकरच पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सुरू होण्याची शक्यता आहे.. माझगाव डॉक शिप बिल्डिंग लिमिटेड कंपनीने 6 वॉटर टॅक्सींची निर्मिती केली.. तर यातील 1 टॅक्सी खरेदी करणा-या कंपनीने, इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव देखील राज्य आणि केंद्र सरकारकडे मांडला आहे.. यामुळे या प्रस्तावाला सरकारने मान्यता दिल्यास, मुंबईतही पहिली स्वदेशी इलेक्ट्रिक टॅक्सी धावणार… तसेच, गेट ऑफ इंडिया आणि बेलापूर जेट्टीवर चार्जिंग पॉइंटसह आवश्यक सुविधा उभारण्यासाठी देखील विनंती करण्यात आलीय..