डोंबिवलीत मद्य, गांजा सेवन करून रस्त्यावर गैरशिस्तीने वागणाऱ्या तीन जणांवर गुन्हे

सार्वजनिक ठिकाणी मद्य, गांजा सेवन करून गैरशिस्त करण्यास प्रतिबंध असताना येथील मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी रात्री तीन जणांनी वेगळ्या ठिकाणी मद्य, गांजा सेवन करून सार्वजनिक ठिकाणच्या रस्त्यावर गैरशिस्त केल्याने मानपाडा पोलिसांनी या तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

विधानसभा निवडणुकीचा कालावधी सुरू आहे. आदर्श आचारसंहिता सुरू आहे. कायदा आणि सुव्यव्यवस्था राखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अशा परिस्थितीत मानपाडा पोलिसांना गस्त घालत असताना शनिवारी तीन वेगळ्या ठिकाणी तीन जण मद्य सेवन करून, गांजाचे सेवन करून सार्वजनिक रस्त्यावर गैरशिस्त करत असल्याचे आढळून आले.

गोळवली भागात राहणारे सागर कसबे हे अंडाबुर्जी विक्रीचा व्यवसाय करतात. शनिवारी रात्री गोळवली पांडुरंवाडी भागात सागर कसबे हे मद्य सेवन करून सार्वजनिक ठिकाणी गैरशिस्त करत असल्याचे मानपाडा पोलीस ठाण्याच्या गस्तीवरील पोलिसांना आढळले. त्यांनी सागर यांच्याकडे आपल्याकडे मद्य सेवन करण्याचा परवाना आहे का, अशी विचारणा केली. त्यांनी असा परवाना नसल्याचे पोलिसांना सांगितले. मद्य सेवन करून सार्वजनिक ठिकाणी गैरशिस्त केल्याने हवालदार अशोक आहेर यांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाने सागर कसबे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *