पेट्रोल डिझेल २ रुपयांनी महाग होणार

पेट्रोल डिझेल २ रुपयांनी महाग होणार

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने अनेक गोष्टींवरील करांमध्ये वाढ केली आहे. यात पेट्रोल-डिझेलवरील करात २ रुपयांनी वाढ केली आहे. तर सिगारेट, दारू, शीतपेय, हिरे आणि सोने यांच्यावरील करातही वाढ करण्यात आली आहे.

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे. राज्य सरकारने एलबीटी आणि टोल रद्द केल्याने तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे तिजोरीवर बोजा पड़त आहे. त्यामुळे काही गोष्टींवरचा कर वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलवर प्रतिलिटर २ रुपये कर वाढवणार आहे.  दारू, सिगरेट, वायु मिश्रित शीतपेयांवर ५ टक्के कर वाढवणार आहेत तर हिरे, सोने, त्यांचे दागिने महागणार आहेत.

सरकारच्या दुष्काळग्रस्तांसाठी पेट्रोल-डिझेलवर प्रतिलीटर २ रूपये कर वाढविण्याचा निर्णयाचा फटका सर्वाधिक ग्रामीण जनतेला बसणार आहे. मोठ्या शहरातील पेट्रोल डिझेलवरील एलबीटी रद्द केल्याने मोठ्या शहरातील नागरिकांना पेट्रोल-डिझेलमध्ये ३ ते ४ रुपयांची सूट मिळणार होती. पण आता कर वाढल्याने त्यातील दोन रूपये वजा झाल्याने केवळे १ ते २ रुपयांचा दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *