मोठी बातमी! मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी, ९ प्रवासी जखमी, दोन जणांची प्रकृती गंभीर

मुंबईमधील वांद्रे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये ९ प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच यातील दोण जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

वांद्रे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. रेल्वेत चढण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रेल्वेत चढत असतानाच झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये काही प्रवाशी प्लॅटफॉर्मवर पडले. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन ९ प्रवासी जखमी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *