निलेश राणे उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच नेत्यांकडून बैठकांचा धडाका सुरु आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु आहे. दुसरीकडे महायुतीमधील भारतीय जनता पक्षाने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सोमवारी दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. तसेच मनसेच्या उमेदवारांचीही यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व घडामोडींसह राजकीय घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *