मित्राच्या पत्नीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार; अत्याचाराचे चित्रीकरण, पीडितेसह सर्वजण उच्चशिक्षित

तीन जणांना वेगवेगळ्या दिवशी पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्यास सांगून पतीने त्याचे चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुनावळे येथे घडली. पीडिता आणि सर्व आरोपी हे उच्चशिक्षित असून, एका बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहेत.

याप्रकरणी ३० वर्षीय पत्नीने ठाणे शहरातील एका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मात्र, हा प्रकार रावेत भागात घडल्याने हे प्रकरण तपासासाठी बुधवारी (१६ ऑक्टोबर) रावेत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. अभियंता असणाऱ्या पत्नीने फिर्याद दिल्यानंतर तिच्या पतीसह चार जणांविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सप्टेंबर २०२३ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत पुनावळे येथे घडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *