मालाडमध्ये जमावाच्या मारहाणीत मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू; व्हायरल व्हिडिओची पक्षाने घेतली दखल, नेते म्हणाले…

मालाड पूर्व रेल्वे स्थानकाजवळ १३ ऑक्टोबर रोजी भयंकर घटना घडली. रिक्षाचालकाबरोबर झालेल्या वादात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या मारहाणीत मृत झालेला तरुण मनसेचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.

नेमकं प्रकरण काय?

आकाश माईन (वय ३१) १३ ऑक्टोबर रोजी मालाड पूर्व शिवाजी चौक येथून दुचाकीवरून जात होता. त्यावेळी पुढे जाणाऱ्या रिक्षा चालकाने रिक्षा अचानक वळवल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यातून त्याचे एका रिक्षाचालकाशी भांडण झाले. वाद वाढल्यानंतर रिक्षा चालकाचे मित्र, स्थानिक फेरीवाले तेथे जमले. जमलेल्या सुमारे १० ते १५ जणांनी मनसे कार्यकर्ता आकाश याच्यावर हल्ला केला. लाथा-बुक्क्यांनी केलेल्या मारहाणात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ जवळच्या ट्रामा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आकाश माईनचा मृत्यू झाला. या हल्ला प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाशच्या पायाला, हाताला, पोटावर व कंबरेला मारहाणीमुळे गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *