सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होताना दिसत आहे. पितृपक्षात सोन्याने उच्चांक दर गाठला होता. तर, नवरात्रीत सातत्याने दरात चढ-उतार होत होते. आज सोन्याच्या दरात मात्र घट झाली आहे. दिवाळीच्या आधीच सोन्याच्या दरात घट झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाहूयात आज किती आहेत सोन्याचे दर
आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. ही घट किंचितशी असली तरी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 50 रुपयांची घट झाली आहे. तर, प्रतितोळा सोनं 77,620 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 50 रुपयांनी कमी होऊन 71,150 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, 18 कॅरेट सोन्याचे दर 40 रुपयांनी कमी झाले असून प्रतितोळा 58220 रुपयांवर स्थिरावले आहेत.
