मधुमेही रूग्णांमध्ये डायबेटिक फुट ची समस्या सध्या वाढताना दिसून येत आहे. पाच वर्षांहून अधिक काळ मधुमेहाने त्रस्त असणाऱ्या रूग्णांमध्ये पाच ते सात रूग्णांना पायाच्या अल्सरचा सामना करावा लागतो. टाईप१ किंवा टाईप २ मधुमेहाने ग्रस्त व्यक्तींना ही समस्या उद्भवते. इतकंच नाही तर जवळपास ७० टक्के लोकांना डायबेटिस फूट अल्सरमुळे जीव गमवावा लागतो.
डायबिटिक फूट अल्सर म्हणजे पायांना अल्सर झाल्यामुळे स्किनचे टिशू तुटतात आणि त्याखालील स्किनची लेयर दिसू लागते आणि अल्सरवर वेळीच योग्य उपचार न केल्यास, एखाद्याला पाय कापावा लागू शकतो. चिंताजनक बाब म्हणजे, डायबिटिक फूट अल्सरमुळे अंगविच्छेदन करणाऱ्या अंदाजे ७० टक्के लोकांना जीव गमवावा लागू शकतो. त्यामुळे पायाच्या अल्सरवर त्वरित उपचार करणे महत्त्वाचे आहे आणि मधुमेहींसाठी ते जीवन वाचवणारे ठरू शकते असे शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता व ज्येष्ठ सर्जन डॉ मोहन जोशी यांनी सांगितले.
