हल्ली तंत्रज्ञानाच्या विश्वात ऑनलाईन फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. अशातच डिजीटल जगतातील भामटे एक पाऊल पुढे ठेवत सर्वसामान्य नागरिकांना विविध आमिष दाखवून पैसे लुटण्याचा प्रकार करतात. संभाजीनगरमध्ये असेच काही गृहणींना भामट्याने गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. गृहणींना मोठ्या रक्कमेचे आमिष दाखवत काही भामट्यांनी पैसे उकळल्याचे समोर आले आहे. संभाजीनगरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या गृहणींना या भामट्यांनी आपले टार्गेट बनवले.
नेमके प्रकरण काय?
हल्ली सोशल मीडियावर आपल्याला अनेक मॅसेजे फिरताना दिसतात. ज्यामध्ये तुम्हाला घरबसल्या लाखो कमवा असे आमिष दाखवण्यात येते. असाच मॅसेज या गृहिणींपर्यंच पोहचवण्यात आला. घरबसल्या पैसे मिळणार याचा मोह महिलांना सुद्धा आवरता आला नाही. यामुळे महिला सुद्धा ऑनलाईन गंडा घालणाऱ्या टोळीच्या गुन्ह्यात फसले गेले.
गंडा घालणाऱ्या टोळीने महिलांना टेलीग्रामवरुन पैसे कमवता येणार अशी लालच दिली होती. आता टेलीग्रामवरुन पैसे मिळवण्याआधी महिलांकडून टोळक्यांनी काही पैसाची मागणी केली. आता यामध्ये महिलांकडून पैशांची मागणी करण्यात आली. महिलांना काही दिवसांनतर संशंय आला मग त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
