तरुणीवर अत्याचार; सांगलीत एकास अटक

महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार करून त्याचे चित्रण करत त्याआधारे पुन्हा अत्याचार करण्याचा प्रकार सांगलीत समोर आला. या प्रकरणी संशयिताला अटक करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी मंगळवारी सांगितले.

याबाबत माहिती अशी की, महाविद्यालयात शिक्षण घेणारी तरुणी तरुणासोबत कोल्हापूर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये गेल्याचे काही नागरिकांनी पाहिले. त्यांनी ही माहिती अन्य लोकांना दिली. या नंतर लॉजसमोर लोकांची गर्दीही जमली. जमावाने तरूणाच्या दुचाकीची तोडफोड करत हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत तरुणाला ताब्यात घेतले.तरुणावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला मंगळवारी अटक करण्यात आली.

यानंतर सोमवारी रात्री संबंधित संशयित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित तरुणाने काही दिवसांपूर्वी कॉलेज कॉर्नरवर असलेल्या शॉपमध्ये लैंगिक अत्याचार करून त्याचे छायाचित्रण केले होते. ही चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देत पुन्हापुन्हा अत्याचार केले. या प्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *