दोन पुरुषांनी सरकारला परत केले खात्यात जमा झालेले लाडक्या बहिण योजनेचे पैसे

सरकारची लाडकी बहिण योजना चांगलीच चर्चेत आहे. महाराष्ट्रात लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. पहिल्यांदाच अर्ज दाखल करणाऱ्या महिलांच्या खात्यात एकूण तीन महिन्यांचे मानधन म्हणून 4500 रुपये जमा झाले आहेत. तर अनेक महिलांना तिसरे मानधन देखील मिळाले आहे.  लाडकी बहिण योजनेचा गैरफायदा घेतल्याचे तसेच सरकारची फसवणूक झाल्याचे प्रकार देखील समोर येत आहेत. अशातच  दोन पुरुषांनी बँक  खात्यात जमा झालेले लाडक्या बहिण योजनेचे पैसे सरकारला परत केले आहेत. अकोल्यात हा प्रकार घडला आहे.

राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरिता अकोल्यात 6 पुरुषांनी अर्ज भरले होते. यापैकी 5 पुरुष हे अकोला महानगरपालिका हद्दीतील रहिवासी आहेत. तर. एक हा अकोट तालुक्यातील आहे. या पुरुषांनी स्वतःचे आधार कार्ड नारीशक्ती दूत ॲपवर अपलोड करून संपूर्ण माहिती खोट्या स्वरूपाची भरल्याचे दिसून आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *