तीन चोरांशी एकटीच भिडली महिला, कडी तुटली पण दरवाजा असा अडून धरला की

एक महिलेने आपल्या ताकदीच्या जोरावर तीन चोरांना पळवून लावलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात व्हायरल झाला आहे. ही घटना एका ज्वेलर्सच्या घरी झाली आहे. तीन चोर दिवसाढवळ्या ज्वेलर्सच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र एका महिलेने बुद्धीच्या आणि साहसाच्या जोरावर त्या चोरांना पळवून लावलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील झपाट्याने व्हायरल झाला आहे. हा सगळा प्रकार पंजाबच्या अमृतसरमधील वेरका येथील एका ज्वेलर्सच्या घरी घडला आहे.

काय आहे संपर्ण प्रकार? 

अमृतसरमध्ये राहणाऱ्या मनम्रीत यांनी सांगितले की, त्या कपडे सुकत घालण्यासाठी गच्चीवर गेलो होतो. तेव्हा त्या महिलेने वरुन पाहिलं की, तिच्या घराबाहेर तीन युवक तोंडाला कपडा बांधून उभे होते. तेव्हा त्या महिलेला शंका आली आणि ती धावत खाली आहे. ती जशी खाली आली तसे ते तीन युवक घराची भींत ओलांडून घरी शिरण्याचा प्रयत्न करत होते.

महिलेने थोडासाही विलंब न करता दरवाजा बंद केला. ते चोर दरवाजाला बाहेरुन जोरात धक्का देऊ लागले. पण महिलेने दरवाजा उघडू दिला नाही. ती दरवाजाला जोरा अडवून राहली. या सगळ्या झटापटीत घराची कडी तुटली पण महिलेने हार मानली नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *