बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांच्या पायाला गोळी लागल्याची घटना समोर आली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी सकाळी ४.४५ वाजता अभिनेत्याला त्यांच्याच रिव्हॉल्व्हरमधून गोळी लागली. अभिनेता इतक्या सकाळी लायसन्स रिव्हॉल्व्हर घेऊन कुठे जात होते? याबाबत आता अभिनेत्याच्या मॅनेजरने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
गोविंदा यांच्या मॅनेजरने दिली माहिती
गोविंदा यांच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता आणि शिवसेना नेते गोविंदा कोलकत्त्याला निघाले होते. कोलकत्त्याला जाण्याआधी गोविंदा आपलं रिव्हॉल्व्हर त्यांच्या बॅगमध्ये ठेवत होते. त्यावेळी अचानक त्यांच्या हातातून रिव्हॉल्व्हर सुटलं आणि त्यातून निघालेली गोळी थेट त्यांच्या पायाला लागली.
