अॅना सबेस्टियन या तरुणीचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नागपूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. HCL या कंपनीत काम करणाऱ्या ४० वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू कंपनीच्या स्वच्छतागृहात झाला आहे. नितीन एडविन मायकल हे सिनीयर अॅनालिस्ट म्हणून कंपनीत काम करत होते. कंपनीच्या स्वच्छतागृहात ते गेले त्यानंतर ते स्वच्छतागृहात पडले. ते काहीही हालचाल न करता पडले आहेत हे पाहून त्यांना तातडीने नागपूरच्या एम्स रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
शवविच्छेदन अहवालात काय समोर आलं?
नितीन मायकल एडविन मायकल यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं जेव्हा त्यांचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टने झाल्याची बाब समोर आली. या प्रकरणाती अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नितीन यांच्यामागे त्यांची पत्नी आणि सहा वर्षांचा मुलगा असं कुटुंब आहे. या प्रकरणी HCL या कंपनीने दुःख व्यक्त केलं आहे आणि ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.
