राजाच्या दरबारात तरुणीला मारणा-या महिला पोलिस निलंबित

राजाच्या दरबारात तरुणीला मारणा-या महिला पोलिस निलंबित

लालबाग राजा गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात तरुणीला केलेल्या बेदम मारहाणी प्रकरणी मुंबई पोलिसांनी मंगळवारी दोन महिला पोलिसांना निलंबित केले.

शुक्रवारी संध्याकाळी लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलेल्या नंदिनी गोस्वामी या तरुणीला महिला पोलिस मारहाण करत असल्याचा २९ सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले.

ही तरुणी व्हिआयपी गेटमधून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी झालेल्या शाब्दीक वादावादीतून महिला पोलिसांनी या तरुणीला बेदम मारहाण केली होती. स्वत:हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाण्यासाठी आम्ही व्हिआयपी गेटमधून आत जाण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या आधी अनेक जण त्या गेटमधून आत गेले होते. त्यांना का मारले नाही ? असा सवाल या तरुणीने केला. मनोरुग्ण असल्याचा पोलिसांचा आरोपही या तरुणीने फेटाळून लावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *