HDFC बँकेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू, सहकाऱ्यांचा आरोप

बँकेतील एका महिला कर्मचाऱ्याचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप आहे. मंगळवारी ही घटना लखनऊ या ठिकाणी असलेल्या बँकेच्या शाखेत घडली. तिच्या मृत्यू मागे कामाचा अतिताण आहे असं तिच्या सहकारी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. तसंच या संदर्भातले काही मीडिया रिपोर्टही हाच दावा करत आहेत. पुण्यात काही दिवसांपूर्वी EY या कंपनीत काम करणाऱ्या अॅना सबेस्टियनचा मृत्यू झाला होता. त्यामागेही कामाचा अतिताण हेच कारण होतं. आता अशी आणखी एक घटना प्रकाशात आली आहे.

फातिमा सदाफ या महिलेचा मृत्यू

ज्या महिलेचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू ( HDFC Bank Employee Death ) झाला त्या महिलेचं नाव सदाफ फातिमा आहे. ती डेप्युटी व्हाईस प्रेसिडंट म्हणून गोमती नगर या ठिकाणी असलेल्या शाखेत काम करत होती. फातिमा ऑफिसमध्ये खुर्चीवर बसलेली असताना अचानक कोसळली. तिच्या सहकाऱ्यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी तिथे तिला मृत ( HDFC Bank Employee Death )घोषित केलं. यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी सदाफ फातिमाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *