कास पठारावर पर्यटकांची मोठी गर्दी, वाहतूक कोंडी आणि यंत्रणेवर ताण

जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावरील फुले पाहण्यासाठी रविवारी पर्यटकांनी मोठी गर्दी केली. यामुळे पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली, तर प्रत्यक्ष पठारावर जत्रा भरल्याचे चित्र दिसत होते. या गर्दीने कासची व्यवस्था पाहणारी यंत्रणाही कोलमडून गेली.

जागतिक वारसा स्थळ म्हणून गौरविल्या गेलेल्या कास पठारावर गेल्या काही दिवसांपासून रानफुले दिसू लागली आहेत. पाऊस उघडल्यानंतर ही फुले दिसू लागल्याने पर्यटक पठारावर येऊ लागले आहेत. काल, रविवारी सुटीमुळे या पर्यटकांच्या गर्दीत मोठी वाढ झाली. यामुळे पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली तर प्रत्यक्ष पठारावर जत्रा भरल्याचे चित्र दिसत होते. या गर्दीने कासची व्यवस्था पाहणारी यंत्रणाही कोलमडून गेली. आलेल्या पर्यटकांना पठारावर प्रवेश नाकारण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *