रात्री मेंदी काढली अन् विहिरीत उडी घेतली, आईला त्या अवस्थेत पाहून लेकीनेही जीवन संपवलं, तर मुलगा…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील एकाच कुटुंबावर मोठा भयानक प्रसंग ओढावला आहे. आईने मध्यरात्री विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. आईला त्या अवस्थेत पाहून मुलीनीदेखील विहिरीत उडी घेत आपलं आयुष्य संपवल्याचं समोर आलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसंच, नातेवाईंकाडून हळहळदेखील व्यक्त करण्यात येत आहे.

आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे दिसताच मुलीनेही विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना समोर आली आहे. वंदना भरत दुधारे आणि पल्लवी भरत दुधारे असं या दोन्ही मायलेकीचं नाव असून त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या मायलेकींच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या निधनाच वृत्त समजताच भाऊ वाल्मीक जनराव त्यांच्या पत्नीला घेऊन अंत्यविधीसाठी निघाले होते मात्र मध्येच त्यांचाही अपघात झाला आहे.

आई आणि बहिणीच्या मृत्यूची बातमी समजताच भाऊ घरी येण्यासाठी निघाला होता. पत्नीला घेऊन अंत्यविधीसाठी तो निघाला होता. मात्र वाटेतच त्याचा अपघात झाला. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.

नेमकं काय घडलं?

दुधारे कुटुंब हे गेल्या अनेक दिवसांपासून शेतात राहत होते. रात्री सर्व कामे आटपून मुलगी पल्लवीने तिच्या आईच्या हातावर मेहंदी काढली आणि सर्वजण झोपी गेले. मात्र सकाळी उठल्यावर पल्लवीला तिची आई दिसून न आल्याने तिने आसपास शोध घेतला. तेव्हा तिला आईचा मृतदेह विहिरीत असल्याचे दिसले. त्यानंतर तिने कोणाताही विचार न करता स्वतः विहिरीत उडी घेत आत्महत्या केली, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान दोघी मायलेकींच्या आत्महत्येचं कारण काय, याचा शोध पोलिस घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *