गुंगीचे औषध देऊन १४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार

खाद्यपदार्थांतून गुंगीचे औषध देऊन १४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीविरोधात चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी आठ महिन्यांची गरोदर असून तिच्या आत्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नोव्हेंबरमध्ये पीडित मुलगी खेळत असताना खाऊ देण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला घरी नेले व तांदळाच्या पेजमधून तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी कोणालाही माहिती दिल्यास तिला व तिच्या आत्याला मारून टाकण्याची धमकी दिली. पीडित मुलगी गरोदर असल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तिच्या आत्याच्या तक्रारीवरून याप्रकरणी ५० वर्षीय आरोपीविरोधात बलात्कार व पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *