अनैतिक संबंधाचा बळी; प्रियकरासाठी महिलेने पतीचाच जीव घेतला, दोन चिमुकल्यांसमोरच…

गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. अगदी क्षुल्लक कारणांवरुनदेखील गुन्हे घडत आहेत. यवतमाळमध्येदेखील घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथे अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रभाकर मारवाडी असं हत्या झालेल्या पतीचे नाव आहे.

प्रभाकर यांची पत्नी जयश्री हिचे सूरज रोहनकरसोबत अनैतिक संबंध होते. मात्र त्यांच्या संबंधात पती प्रभाकर अडसर ठरत असल्याने दोघांनी त्यांची हत्या करण्याचा कट रचला. पत्नीनेच पतीच्या मदतीने प्रभाकर याची हत्या घडवून आणली आहे. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथे ही घटना घडली आहे. दोन चिमुकल्यांसमोरच महिलेने पत्नीची हत्या केली आहे.

पत्नी जयश्रीचे सुरज रोहनकरसोबत अनैतिक प्रेम संबंध होते. त्यामुळे पतीचा काटा काढण्यासाठी जयश्री आणि सूरजने प्रभाकरचे राहत्या घरी तोंड दाबून त्याची हत्या केली व त्याचा मृतदेह गावाबाहेर झुडपात फेकून दिला. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह त्यांच्या दोन मुलांना चौकशीसाठी बोलवले. तिथे त्यांची उलटतपासणी केल्यानंतर पत्नीने हत्या केल्याचे उघड झाले. पोलिसांनी शिताफीने तपास करीत गुन्ह्याची उकल केली आहे. आधी महिलेचा प्रियकर फरार होता मात्र नंतर दोन्ही मारेकऱ्याना अटक केली आहे.

संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंग

आंतरजातीय प्रेम विवाह केल्याच्या रागातून सासर्‍याने आपल्या जावयाचा खून केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजी नगरात समोर आलीय. अमित मुरलीधर साळुंखे असं या तरुणाचं नाव असून तो शहरातील इंदिरानगर भागात राहत होता. खाजगी कंपनीत काम करणाऱ्या अमितचे त्याची लहानपणाची मैत्रीण विद्यासोबत प्रेम संबंध होते आणि त्यांनी प्रेम विवाह देखील केला होता

मुलीच्या कुटुंबीयांनी हा राग मनात धरून 14 जुलै रोजी अमितच्या पोटात चाकूचे वार केले यात तो गंभीर जखमी झाला आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेला 11 दिवस उलटून गेल्यानंतरही आरोपीला अटक झालेली नाहीय.. पोलीस आरोपी साऱ्याचा शोध घेताय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *