रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, कर्जत येथील शाळांना उद्या सुट्टी

जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सोमवारी महाड, पोलादपूर आणि कर्जत तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

जिल्ह्यात रविवारी दिवसभर जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे सावित्री, कुंडलिका नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे महाड, पोलादपूर परिसराला पूरसदृश्य परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. हीबाब लक्षात घेऊन सोमवारी तीन तालुक्यातील शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरीत १३ तालुक्यात शाळा नियमित सुरू राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *