मुंबईत ग्रँट रोडमध्ये इमारतीचा भाग कोसळला, बचाव कार्य सुरु

मुंबईत सकाळपासून सुरु असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे रस्ते आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. पावसाने १० नंतर काहीशी विश्रांती घेतली. असं असतांना मुंबई शहरात ग्रँट रोड परिसरात रुबिना मंझिल इमारतीचा एक भाग कोसळ्याची घटना घडली आहे. इमारतीचा एक भाग हा रस्तावर कोसळला, यात काही जण यात जखमी झाले असून एक जण दगावल्याची प्राथमिक माहिती दिली आहे.

ही दुर्घटना ११ च्या सुमारास घडली. दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम स्थानिक नागरीकांनी केलं. तर काही वेळेत मुंबई अग्निशमन दलाचे जवान पोहचले आणि त्यांनी इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढायला सुरुवात केली आहे. इमारतीत २० पेक्षा जास्त रहिवासी अडकल्याची प्राथमिक माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *